अफुच्या नशे सारखे!
अफुच्या नशे सारखे!
1 min
184
अफुच्या नशे सारखे
झिंगते आहे मी तुझ्यात...
तू मात्र कधी कधीच
झिंगतो आहेस माझ्यात...
तुझ्या त्या कधी कधीसाठीच
रूजते आहे मी तुझ्यात...
तू मात्र वरवरच
रूजतो आहेस माझ्यात...
तुझ्या त्या वर वरसाठीच
मुरते आहे मी तुझ्यात...
तू मात्र बंध संबधासाठीच
मुरतो आहेस माझ्यात...
तुझ्या त्या बंध संबधासाठीच
संपते आहे मी तुझ्यात...
तू मात्र अफुच्या नशेसारखेचं
ऊरतो आहेस माझ्यात....
