प्रणयाची भावनाच जळते....
प्रणयाची भावनाच जळते....
समीप असताना
अन् कधी दूर असताना
अपुल्या गैरसमजुतीने
वादालाच उद्धाणं येते...
कधी मनाची
तव प्रेमाची
प्रितीच्या प्रणयाची
भावनाच जळते....
तरीही तू लगडं करतां
श्वासाजवळी येतां
मज नको वाटते सारे
मनही नाकारते...
खोटे आवेशात
बिलगणे उसवणे
नाटकी वागणे
मला ना जमते....
रागात मला
विचार सुचेना
त्या क्षणाला
तुझे प्रेम नकोसे वाटते...
वादळ शमते
राग विरघळतो
मज उमजते
बंध नाही हे तुटायचे...

