STORYMIRROR

Vidya Sarmalkar

Others

4  

Vidya Sarmalkar

Others

तुज हरवले का?

तुज हरवले का?

1 min
401

तू पाहीले

अन् नभ ढगाळले

वाहले मी

तुज कळले का?


तू कुजबुजले

अन् घन कोसळले

बिलगले मी

तुज भासले का?


तू स्पर्शले

अन् मेघ दाटले

बरसले मी

तुज भिजवले का?


तू दुरावले

अन् आभाळ ओशाळले

संपले मी

तुज हरवले का?


Rate this content
Log in