माझ्यातच जगशील का...???
माझ्यातच जगशील का...???
वाटल बोलावं तुझ्यासोबत
पण तू स्वीट्च ऑफ
वाटल भेटावं तुला
पण तू आऊट ऑफ कव्हरेज ऐरीआ...!
वाटल सांगावस काही
पण तू औषधाने निद्रिस्त...!
वाटल छेडावं तुला
पण तू ध्यानस्थ आर्त...!
काहुरले मनं, तुझ्याविणा
एकटेच भयमयं...!
आता वाटतयं,
नको तुला त्रास देणं
नको तुला छळणं....!
तुला हवं तस वागावं
तुला हवं ते बोलावं...!
तुलाच थाप द्यावी
स्वप्नात साथ करावी...!
जीवन संपण्याआधी रेष आखावी
ती लयास नेण्यास कसावी...!
पण या सगळ्यासाठी,
तू एक करशील का...?
तू सोबत मला देशील का??
फक्त माझ्यातच जगशील का...???
