प्रेमाच जाळं
प्रेमाच जाळं
विचित्र असत हे प्रेमाच जाळं
ज्याचासाठी विणायचं
नकळत त्याच्याचं
जाळ्यात सापडायचं...
विचित्र असत हे प्रेमाच जाळं
जळ्यात आपण ही अडकायचं...
त्याच्या एका नजरेसाठी
व्याकुळ होऊन झुरायचं,
काय पाहतोस म्हणतं
त्यालाच धुडकावून लावायचं
विचित्र असत हे प्रेमाच जाळं
जळ्यात आपण ही अडकायचं...
मनातल्या मनात त्याच्यासोबत
संसार ही ठाटुन बसायचं
लग्नाच्या संघर्षा वेळी
आई वडिलांवर सोडायचं
विचित्र असत हे प्रेमाच जाळं
जळ्यात आपण ही अडकायचं...
दुज्या गावच्या नव्या वाऱ्यात
त्याच्याच गारव्यासाठी झुरायचं
संसारात रमल्यावर ही
मनातला संसारावर तरायचं
विचित्र असत हे प्रेमाच जाळं
जळ्यात आपण ही अडकायचं...
