माझं मलाच शिकु दे
माझं मलाच शिकु दे
1 min
478
मला
ना अस्तित्वं
ना स्वत्वं
असं का वाटत असेल तुला?
मला
ना कळतं
ना जमतं
असं का वाटत असेल तुला?
मला
ना अधिकार
ना हक्क
असं का वाटत असेल तुला?
अरे
मला ही कळतं
कळतं की चुकतं
ते पाहु तर दे मला!
मला
ना म्हणणं
ना करू देणं
आता थांबव तू जरा!!
तुझ्याप्रमाणे मला ठरवु दे
माझ्या गरजा समजु दे
आणि हो
चुकलं तर चुकू दे
पण माझं मलाच
शिकू दे!!!
