तुझ्या डोळ्यातला पाऊस...!
तुझ्या डोळ्यातला पाऊस...!


तू घेऊन येतोस पाऊस,
तुझ्या डोळ्यातून..अन..
फुलून येतात मळे,
माझ्या मनातून...! १.
तुझी मौन व्यथा!,
बरसुन...बरसुन,
माझी प्रित-स्पंदने तू,
झेलावित हसुन-हसुन...! २.
अखेर..तो तरसतो,
खरोखरच मग बरसतो..
त्या धुव्वाधार वृृृष्टीनंतर,
हरिततृृणांचा भाला हौतो...! ३.
..तू..आणि..हा पाऊस!,
अन..पेटून उठतं अवघं रान..!
तुझ्या डोळ्यातला पाऊस,
माझं..हिरवं पान-पान...!!!