तुझ्या आठवणींची संध्याकाळ
तुझ्या आठवणींची संध्याकाळ
आपली दररोजची संध्याकाळ आठवते का तुला
मन व्याकुळ झाले आता तुझ्या एका भेटीला
मी अजूनही जात असतो त्याच झाडाच्या सावलीत
तू नसलीस तरीही बसतो तुझ्या आठवणींत वेळ घालवीत
तुझ्यासोबत कितीदा पाहिल्या होत्या सुर्यास्ताच्या सुंदर छटा
आज त्याच करून देतात माझ्या अश्रूंना मात्र मोकळ्या वाटा
तुझे आयुष्यात येणे किती अनपेक्षित होते
तुझे अचानक जाणे हे त्याहून अकल्पित होते
तुझ्या असण्याने जगणे किती अर्थपूर्ण होते
आता मात्र तेच सर्व मला नीरसच भासते
सुर्यास्तानंतर आकाशात दाट काळोख पसरतो
माझ्या मनातला अंधारही अधिक गडद होत जातो
