तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी
मनास छळतात
थोड हसवतात
कधी रडवतात
तुझ्या आठवणी..!!
सदा आठवतात
मला भुलवतात
बेचैनही करतात
तुझ्या आठवणी..!!
स्वप्नं जागवतात
मन दुखावतात
श्वास गुंतवतात
तुझ्या आठवणी..!!
कधीही येतात
निघून जातात
मला गुंगवतात
तुझ्या आठवणी..!!
मला तरसवतात
तरीही आवडतात
मनही मोहवतात
तुझ्याच आठवणी..!!

