तुझी सावली
तुझी सावली
आयुष्याच्या तप्त उन्हात तुझे सावली बनून येणे.
काही काळ का होईना,मन सुखावून गेले.
यातना ,दुःख यांनीच व्यापले होते जीवन.
तू आलास अन आयुष्यात आली हिरवळ.
हळुवार फुंकर घातली तू दुखऱ्या मनावर.
तुझ्या प्रेमाचे गारुड अलगद विसावले मनावर.
किती सुंदर क्षण दिलेस तू न मागता ही.
सवय झाली होती तू आणि तुझ्या सोबतीची.
सगळंच कसे रे संपुन गेले ,काहीच नाही बाकी.
कसे आणि किती वेचू तुझ्या आठवणीचे मोती.
सांग ना का अशा साऱ्या संवेदना गोठल्या?
तू गेलास निघून पण तुझ्या पाऊलखुणा मात्र मागे उरल्या.
म्हणाला होतास कायम तुझी सावली राहीन बनून.
कुठेच नाहीस रे तू ,का प्रेम तुझे होते क्षणभंगुर?

