STORYMIRROR

Nalanda Wankhede

Tragedy

4  

Nalanda Wankhede

Tragedy

तुझी साथ

तुझी साथ

1 min
782


जीवनाच्या प्रत्येक वाटेवर

तुझेच पाऊल आहे

आहे तुझी साथ म्हणुन

आभाळही मला ठेंगन आहे


तुझी साथ हिम्मत देते

दुख्खाला मिठी मारण्याची

संकट कितीही आले तरी

ऊर्जा नवीन वाट शोधन्याची


तुझी साथ प्रेमाला

घालते गवसनी

प्रेम तुझे जीवनाला

देते कलाटनी


साथ तुझी आहे म्हणुन

प्रत्येक क्षण जीवनाचा बहरतो

दुख्ख कितीही असले पदरी तरी

प्रेमाचा नाजुक धागा ओटी भरतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy