तुझे शब्द
तुझे शब्द
नको तुझे काव्य नको तुझी कविता
शब्दांचा मला घात होतो
करितो तुझ्या शब्दांवर कविता मी
परि कागदावर रिता आज होतो
जडली सवय तुझ्या शब्दांची
तुझ्या शब्दांविण क्षणही सरत नाही
गर्दीत राहून शब्दांच्या
मी सदैव एकटाच होतो
तुझे ते शब्द ओठांवर येतात
तुझ्या शब्दांमची कविता होते
त्या शब्दांना मांडताना कागदावर
मी कवि असल्याचा मला भास होतो
तुझ्या आठवांचा पाऊस
नकळत आभाळ फाडतो
कितीही घातला बांध तरी
डोळ्यांत त्याचा महापूर होतो
तुझ्या आठवांचे शब्द
येता ओठांवर माझ्या
उमलते नवे गीत अन्
सूर त्यांचा नवा होतो
कितीही नको म्हटले ते काव्य
अन् नको ती कविता
मनाला मात्र
तुझ्या शब्दांचाच आधार होतो...

