STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Romance

3  

akshata alias shubhada Tirodkar

Romance

तुझा रूसवा...

तुझा रूसवा...

1 min
153

त्या दिवशी माहित नाही का तू रूसलेला...

गरमागरम पुरीसारखा फुललेलास...

विचारलं तर म्हणाला काही नाही आणि गाल फुगवून तू परत बसलास....


चेहऱ्यावर हसण्याला दिली होती तू सुट्टी...

कपाळावर मात्र नजर येत होती आठी...

गाल फुलवल्यामुळे बोलणंही बंद होतं...

जसं काही ठरवलं तू मौनव्रत करावं...


हलक्या फुलक्या माझ्या विनोदानी नाही आलं तुला हसू...

मग मीच सुरू केलं मोठ्याने रडू...

मला काय झाले हे तुला नाही उमगलं

काळजीपोटी तू मला विचारलं...


तुला बोलताना पाहून आलं मला हसू...

गरमागरम गालाची पुरी गेली होती वितळून...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance