तुझा चांदण्याचा हात
तुझा चांदण्याचा हात
गुलाब तुझ्या हे गाली
रवी पसरवी लाली
छूमछूमती पैंजणे
भासले प्रभात झालीं ||१||
सांज सखे अशी व्हावी
सोनपावली तू यावी
रजनीगंधा फुलावी
सुगंधीत तनू व्हावी ||२||
आज लाभला एकांत
मीलना अतूर होत
मिठीत तू नी उशाला
तुझा चांदण्याचा हात ||३||
