STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

4  

Manisha Wandhare

Abstract Romance

तु माझ्या स्वप्नात यावे ...

तु माझ्या स्वप्नात यावे ...

1 min
205

तु माझ्या स्वप्नात यावे , अलगद पापण्यांना दिसावे ,

तुझे असे येणे अन् जाणे ,,वेडे मनाला माझ्या करावे ...


दबक्या पावलांनी ,

ती लपत छपत येते ,

तिच्या सवे सांजही ,

जराशी हसत वळते ...


का? उशीर करतेय ,

घरी जायला रात्र म्हणते ,

दिवस नाही बरे अगं ,

वाट सांजेची कन्हते ...


भेटून तुला परतीला ,

इथुन पाय ना निघते ,

तु थांबवतोस मला ,

हुरहूर मनाला लागते ...


जशी नदी भेटते सागराला ,

प्रितीला उधाण माझ्या येते ,

भरतीचा हा मौसम दिवाणा ,

मी तिचे ती माझे गित गाते ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract