STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Romance

3  

Urmi Hemashree Gharat

Romance

तु आणि मी....

तु आणि मी....

1 min
5.8K



तू अधीर चांदरात

मी चांदणवेडी पहाट


तू क्षितिजापल्याडची कमान

मी इंद्रधनुची आरास


तू प्राजक्ताचा मुक्त दरवळ

मी कस्तुरीचा मोहक वावर


तू गुलमोहर तेजोमय सोनेरी

मी मुक्त एक फुलराणी


तू अबोल अव्यक्त गारवा

मी व्यक्त अशी भावना


तू दवबिंदुची ऊधळण

मी पावसातली रिमझिम


तू कतृत्वाची महती

मी हौशी ऊत्साही ऊर्मी


तू तूच... मी मीच ....

तुझ्याविन मी असे अपूर्ण

तूच माझे सौभाग्य

तूच माझे आयुष्य


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance