STORYMIRROR

sarika k Aiwale

Fantasy Inspirational

3  

sarika k Aiwale

Fantasy Inspirational

ठरवून जगते का...

ठरवून जगते का...

1 min
238

ठरवून गेला हवेचा रोख तो

फिरुनी भाव जगावा मी कसा ...

बंद आहेत आयुष्याचे कवाडे

श्वास मोकळा घ्यावा कसा

ठरवुन केली प्रतारणा श्वसाशी

जगण्याचे स्वप्न जगावे कसे

खुल्या अंगणी कोमेजली पालवी

सावली उन्हातली शोधू कशी

ठरवुन घेतला माघार जीवनी

स्वाभिमानाने आघात साहू कशी

विचलित होता वेदना मनीच्या ही

सांग दोष वाटेला द्यावा कसा

उरुनी राहते सल काळजात ती

पाऊले थकता ही सरशी कसली

ठरवुन घातला घाव उरी तो

स्वाभाविक त्याला म्हणू कशी

जीव अंतरला मनास कोड उमजेना

भाव परका असा जगते कोणता मी

ठरवून काही केले तरिही ...

परतुनी जन्मा येवू कशी मी...

ठरवुन होतात का हे नक्षत्र तारे

सांगून जन्मा येतात का ते सारे

ठरवून जगते का अनियमित वाहते नदी ती

आसवांच्या खोल गर्तेत सापडतील का खुणा

का विसरुन जन्म येईल पुन्हा मी जन्मा

ठरवुन दुरावले जे क्षण येतील परतुनी..

का छळ उगाच अंतरीचा

कळ काळजा ती सोसू कशी...

सांग अनोळखी तरी जगू कितीदा मी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy