STORYMIRROR

Rahul Sontakke

Tragedy Action Classics

3  

Rahul Sontakke

Tragedy Action Classics

तरुणांचा भारत

तरुणांचा भारत

1 min
149

तरुण मी या भारताचा 

दुखिताचा मी सारथी..! 

मनगटात बळ माझ्या 

पसरली सौंदर्यात धरती


तरुण मी या भारताचा 

कधी कुणास खचू नाही देणार..! 

दीन दुबळ्याची मदत 

धाऊन मी येणार


तरुणांच्या भारतात 

जिंकणे जरी नाही जमले..! 

हे हात देण्यासाठी 

माघे नाही कधी सरकले


मी तरुणांच्या 

अशा देशात राहतो..! 

जेथे नोकरी साठी 

वणवण फिरावे लागते


पोटा साठी नव्हे तर 

या मातृभूमी साठी..! 

थोडे जगावे तर 

थोडे मरावे लागते


जन्म च माझा या भुमिसाठी 

गरिबीत खितपतल्यान साठी..! 

दुखितांसाठी तर कधी 

नव भारतासाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy