त्रिमूर्ती
त्रिमूर्ती
दत्त दिगंबर स्थान
त्रिमूर्तीचे आत्मानंद,
पाहूनिया डोळाभर
मिळे सौख्य जीवनानंद..
वार गुरूवार येता
औंदुबर वृक्षासाद,
प्रदक्षिणा पूर्ण होता
भक्तीमय प्रतिसाद..
दत्त दिगंबर दैव
भक्ता देतसे आशिष,
ब्रम्हा,विष्णू,महेश्वर
रूप भासे निरपेक्ष..
देवा तुझ्या चरणाशी
मन नांदते सदैव,
माया सारी विसरून
दिगंबरा मनी भाव..
अनुसया धन्य माता
पुत्र तेजस्वी लाभला,
विश्व कल्याणाचा घाट
अंतरात प्रकटला..
कर जोडता मुखात
नाम ओजस्वी दत्ताचे,
लीन माथा चरणाशी
सार्थ क्षण आयुष्याचे..
