STORYMIRROR

Pratibha Bilgi

Tragedy

3  

Pratibha Bilgi

Tragedy

तप्त उन्हाच्या झळा

तप्त उन्हाच्या झळा

1 min
266

पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवली 

जनावरांची जीवनासाठी धडपड चालली


जलासाठी चोहीकडे भटकला मनुष्यही

तळाचा थांगपत्ता ना कळला शोधूनही

  

थकला शोधून, प्रत्येक जीव हा शिणला

पाण्याचा लवलेश मात्र नाही सापडला


आकाशाकडे उमेदीत जेव्हा पाहू लागला 

अश्रुही त्या क्षणी आपसूक गोठून गेला 


पाना - फुलांचा पाचोळा चोहीकडे उडाला

हिरव्यागार सृष्टीचा रंग काळाकुट्ट पडला 


पक्षीही आपली घरटी सोडून निघाला

दुष्काळापुढे सगळ्यांनी अहं भाव त्यागला 


भेगा कोरडया पडल्या , जमीनही दुभंगली

काळया आईची पीडा हृदयात खोलवर रुतली


दुष्काळाचा तडाखा काही सहन होईना

होतकरू शेतकरी सुद्धा या प्रसंगाने नमला 


तप्त उन्हाच्या झळांनी प्रत्येकजण होरपळला

शेवटी मनुष्यप्राणी हा निसर्गासमोर हरला 


आता तरी हजेरी लाव रे पाऊसराया 

बघ, कित्येकांच्या हाडांचा सापळा झाला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy