तफावत
तफावत
कुणी उपाशी राहुनी
कुणी तर अपचन अजीर्ण नाने
आहेत बहुसंख्य त्रस्त
एक टोळी भौतिक रित्या सुखी
एक टोळी मात्र अन्न नाही म्हणून दुःखी
एकाला अपेक्षेपेक्षा मिळते
एकाला पदरी नेहमी उपेक्षा जळते
एक खर्च करितो पैसा पाण्यावाणी
एक मात्र रानमाळी हिंडे अनवाणी
एकाच्या घरी अन्नाची नासाडी
एक मात्र घरी भुकेनं तडफडी
एक जायला मारुती ऑडी
एक उपक्षेने पावलं दौडी
एकाला मिळतो बहुमान
एक मात्र दारिद्र्यानं हैराण
एकला लग्नासाठी लवकर मिळतात पोरी
एक मात्र त्रासून त्रासून हिंडे घरोघरी
या जगाची अदाच न्यारी
श्रीमंतीकडे नमिते दुनिया सारी
ज्ञान अन स्वाभिमानाला नाही इथे किंमत
धनवंताला बोलण्याची कुणाचीच नाही हिंमत
अशिक्षित करतात इथे राज्य
सुशिक्षित मात्र तयांची चाकरी करण्या सज्ज
वेडगबाळे इथे करी दादागिरी
हुशार मात्र नाना पदव्या घेऊनि घरी
इकडे आमचा उपेक्षित शेतकरी
संशोधन चालले त्या मंगळावरी
हे देवा काय एवढी तफावत
सत्यला जातय लपवत
असत्याला मात्र नभात झेपावत
हे परमेश्वरा प्रार्थना तुजला
नष्ट कर हा लहानमोठयांचा भेदभावाचा मजला
