तो
तो
तो मला म्हणायचा,
तुझी सर्व शक्ती लेखनासाठी खर्च कर..
सुंदर वाच सुंदर लिही व छान बोल...
तो मला म्हणायचा,
तुझ्या लेखणीतून शब्दाचे वार कर..
सुंदर मनातले गुपित त्यातून खोल...
तो मला म्हणायचा,
शब्दा शब्दांतून लेखणीला धार दे..
कधी कुठेही जाऊ नको देऊ तोल...
तो मला म्हणायचा,
मनातले ध्येय तुझे तू साकार कर..
जाणून घे तू जीवनाच्या कष्टाचे मोल...
शेवटी....थॅंक्स!
"बाय फाॅर नाऊ!"