तो सध्या काय करतो..
तो सध्या काय करतो..
तो सध्या काय करतो...
तसा तो सगळ्यांचाच मित्र
माझा काही खासच आहे
रोजची भेट ठरलेली असे
कधी गच्चीवर बसून त्यासवे
निहरत बसे एकटक त्याला
त्याचे ते हासरे भाव समावत
खिळवून ठेवी तो मला ही
सारे भान त्याच्यात विसरुनही
न जाणो कोणते विश्व दावत असे तो
मला सोडून जताना ही
किती लाल होत असे तो
जणू रागाने लालबुंद होऊन
का विरह हा रोजचा असे ग
इतका बेभान होऊन गुंतते मन
कठिण होतसे मग हृदय ही मग
आज कित्येक दिवस त्यास
भेटले नाही जाऊन खास
असे ओझर्ती भेट त्याची माझी
रोजच येतो न जातो तो
तरीही वाटते एक पोकळी
भेट क्षितिज वर ठरलेली
मन व्याकुळ होतेय आज ही
अजुन किती दिवस हा विरह नशिबी
कधी पहिल मन भरून त्यास ..
कसा असेल तो क्षण खास
संध्या समयीचे त्याचे ते रूप
डोळ्यात साठवून घेण्यास उत्सुक
असा तो माझा सखा..
काय करत असेन काय महीत..
रोजच तो येतो न जातो ..
माझी भेट होत नाही पण
रुसत नाही की रागवत नाही
सुर्योदयापुर्वीची ओढ जाणवते
त्यास अस्तास जाताना पाहण्यास
जीव आतुर तो..
सूर्यास्त त्या मित्रास भेटण्यासाठी
सूर्यास्त इतक्या दिवसानंतर
कसा दिसेल मज कधी भेटेल मज
