STORYMIRROR

Sushama Gangulwar

Tragedy Others

3  

Sushama Gangulwar

Tragedy Others

तो पाऊस

तो पाऊस

1 min
108

परतीचा पाऊस 

काही विसावा घेईना 

हिवाळा की पावसाळा 

ऋतू काही कळेना ? .......


ऋतू आहे कुठले 

लागतं नाही पत्ता 

राजकारणातील पक्षागत 

पावसाने मांडलाय सत्ता......


शेतकऱ्यांच्या नुकसानाला 

मिळतं नाही भत्ता 

निसर्गही मारतोय 

बळीराजाला जीत्ता......


कसले पूराण आणि 

सांगा कसले गीता ? 

देवही झालयं नुसते 

आश्वासने देणारा नेता.....


तुम्ही हो माता,तुम्ही हो पिता 

फक्त बनून राहिलेत गाणे 

बळीराजाच्या हाती 

लागतं नाही हो मूठभर दाने.....


काय करावे काय नाही 

गुदमरतोय हो त्यांचे जीव 

देशाच्या मृत्यूपट्टलाध्ये 

नोंद होतोय बळीराजाचे नाव.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy