STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

तळतळाट घेऊ नका

तळतळाट घेऊ नका

1 min
375

  जीवनाच्या वाटेवर

  सरळ मनाने चालू,

  स्वार्थाच्या बाजाराचा

  रस्ता थोडा चुकवू...


  खोटेपणाचा कळस कधी

  उलथून सहज जाईल,

  अन्यायाची सावली कशी

   क्षण- क्षण उध्वस्त करील..


   मनामनाचे दार खोलूनी

   करू पेरणी आनंदाची,

   ओठांवरील हसू खुलवूनी

   गाठ पदरी पुण्याची...


   असत्य वागूनी तळतळाट 

    कोणाचाच घेऊ नका,

    शाप अंतरीचा संगे घेऊन

   बंदिस्त क्षण अंगिकारू नका..


  तळतळाट सदा कुकर्माची

  साक्ष देऊनी यातना देई,

   सोडवूनी पाश नियतीचे

   महती सत्कर्माची जया गाई..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational