तिसरा डोळा (सीसीटीव्ही)
तिसरा डोळा (सीसीटीव्ही)


डोळे विना पापण्याचे
मोठे करून वटारायचे
नजर सापाप्रमाणे
एकटक बघत रहाणे
वागणुकीस असे खरा
चोवीस तास देई पहारा
घरात आणि दारात
चौकात अनं दुकानात
खाजगी पण कार्यास
हमखास सरकारी कामास
गुन्हेगारांवर ठेवी लक्ष
काम चोखपणे निपक्ष
अंगी असा प्रामाणिकपणा
शंभर टक्के पारदर्शीपणा
ना जात आणि ना धर्म
अखंडपणे सेवा हेच कर्म
यांना धोका फुटण्याचा
किंवा झाकण पडण्याचा
संजय होता महाभारतात
सीसीटीव्ही आता जगभरात