STORYMIRROR

Sunny Adekar

Inspirational

3  

Sunny Adekar

Inspirational

तिरंगा प्यारा अमुचा

तिरंगा प्यारा अमुचा

1 min
69

देश हा अमुचा लोकशाहीचा

डौलाने फडकतो तिरंगा हा

सांगे शौर्यगाथा शुरविरांची

देशास कामी आलेल्या शहीदांची।।1।।


विविध भाषा विविध प्रांत

विविध चाली अन् रिती

सारे नांदती इथे गुण्यागोविंदाने

सर्व धर्म अन् त्या समभावाने।।2।।


भारतीय संस्कृती आहे

जगात अशी लाखात एक

तिच्या परी सोने जसे

आहे आम्हा तिरंग्याचा अन् भारत मातेचा अभिमान।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational