STORYMIRROR

Sanjay Gurav

Abstract

4  

Sanjay Gurav

Abstract

तीचा आनंद

तीचा आनंद

1 min
228

चौकटीच्या आत

रोजचीच बंदी आहे

गिळून दुःखाचे घोट

ती आनंदी आहे.


"तो" फिरतो स्वच्छंदी

तीची दूर आझादी आहे

घरच्याच शत्रुंमुळे आज

झाली जायबंदी आहे.


आकांक्षाला आवरुन

तुटते रोज फांदी आहे

प्रतिष्ठेच्या नावाखाली

जुनीच अजून नांदी आहे.


चूल, मुल सुटतेय हळूहळू

नव्या गाठते रोज संधी आहे

मोकळा श्वास मिळतोय आता

मनापासून ती आनंदी आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract