STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Inspirational Others

3  

प्रणोती राम शेंडे

Inspirational Others

ती वेडी आई

ती वेडी आई

1 min
234

झिजवुनिया रे तिची तिने काया

देण्यास लेकरा थंडी छाया 

त्या वेड्या आईच्या प्रेमाची वेडी माया


कष्ट करण्यास फिरे त्या काट्याच्या वनात 

देण्यास सुख लेकरांच्या मनामनात

जाई लेेकरासाठी सुख वेेचाया


ठेवूनिया मनात तिच्या अनेक दुःख

देई तरीही घर भरून रे सुख

करि प्रयत्न नाही जाओ

तिच्या लेकरांचा जन्म दुःखाने वाया 


संस्काराचे धान तिनेे रे पिकवले

करुनिया कष्ट लेकरू शिकवले

करी नेहमी विचार कसा तिचा लेकरू समोर जाया 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational