ती स्री ती शक्ती
ती स्री ती शक्ती


मी करेन तिची स्तुती,
जग सगळं ओसाडलं,
प्रत्येकाच्या मनी भीती,
तरीही भक्कम ती,
प्रत्येकाला सांभाळून घेती,
न बदले स्वतःची नीति,
ती स्त्री ती शक्ती,
ती प्रेरणा ती शांती
ती तुकोबांनी केलेली,
विठुरायांवरची भक्ती,
ती गंगा ती गोदा,
ती क्रांती ती ज्योती,
ती शिवरायांनी केलेली,
एक एक युक्ती,
ती सूर्योदय ती सूर्यास्त,
ती निरागसता ती सामर्थ्य,
ती तुळशीजवळ लावलेली,
तेजोमय पणती,
ती सण ती उत्सव,
ती विद्या ती सरस्वती,
ती सागर ती सरिता,
ती आकाश ती धरती,
ती कन्या ती भगिनी,
ती पत्नी ती जननी,
ती सून ती वहिनी,
ती माहेरचा जीव,
सासरची प्रगती,
ती स्त्री ती शक्ती,
ती प्रेरणा ती क्रांती,
मी करेन तिची स्तुती,
मी करेन तिची स्तुती...