Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mahananda Bagewadi

Others

3  

Mahananda Bagewadi

Others

ऋतु - हिवाळा

ऋतु - हिवाळा

1 min
206


ऋतू थंडीचा आला गडे,

सोबत दाटुनी आली धुके,

दिसते अंधुक बघा चोहिकडे,

गुलाबी ही थंडी अंगात हुडहुडे,

 पेटल्या त्या शेकोटी दारोदारी,

दवबिंदू ते पानांफुलावरती पडती,

भासे जणू ते लखलखते मोती,

उब देई स्वेटर रग अनं ते चादरी,

मायेचा तो स्पर्श मिळे,

भरभरून आली ही शेती,

जलधारा प्राशन ती करती,

डोले हरभरा अन् ती ज्वारी,

संगे गार वाराही झेलती,

धुकं जसं जाती पसरतं,

हरवी आठवणींच्या जगात,

 घुमे प्रीतीचा तो पारवा,

 सखी तू अलगद यावे मिठीत,

झोंबे अंगी हा गारवा,

निशीत चमचमला तो काजवा,

सुधाकर ही पहा नभी,

गाली हळूच तो लाजला


Rate this content
Log in