STORYMIRROR

Mahananda Bagewadi

Classics

4  

Mahananda Bagewadi

Classics

हा श्रावण मास

हा श्रावण मास

1 min
314


आला बहरुनी

सण हा श्रावण, 

उजळुनी निघे

घर नि अंगण....१


प्रथम सण हा

नागपंचमीचा,

द्वितीय धागा तो

रक्षाबंधनाचा....२


वाजत गाजत, 

गोवर्धन येतो,

प्रेमाचा संदेश 

जगतास देतो....३


सण उत्सवात 

सगळेच दंग, 

व्रतवैकल्यांचे

उधळीत रंग....४


मास हा सणांचा

जीवा हर्ष देई,

आत्माही आपुला 

तृप्ती सुख घेई....५


संपता श्रावण 

वाटे सुने सुने,

कधीच ना भरे

या मासाचे उणे....६



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics