आयुष्य एक चित्रपट
आयुष्य एक चित्रपट
आयुष्य हे आपलं
आहे एक चित्रपट,
आपण सगळे इथले
आहोत जणू नट...
वेगवेगळ्या परिस्थितीत
वेगवेगळी भुमिका,
साकारावीच लागते
जीवनाचे आपण युविका...
चित्रपटाचे युग हे
प्रतिबिंब आपले,
आचार विचार सगळ्याचे
तिकीटचं आपण कापले...
मनोरंजन आपणा सर्वांचे
हे चित्रपट करतात,
नवनवीन उम्मीदीसह
स्वप्न डोळ्यांत भरतात...
