शिवबाची किर्ती
शिवबाची किर्ती
शिवनेरी किल्ल्यावर जन्मलं,
चमकणारं एक गोंडस बाळ
हाती असे सदैव त्याच्या
लखलखती तलवार आणि ढाल...
सह्याद्रीत गरजणारा तो सिंह,
छत्रपती शिवाजी झाला,
वार नखाने करून अफजलखानाचा
कोथळा पाडुन गेला....
मुठभर मावळे सोबत घेऊन,
हजारो सैतानांना नडुन गेला,
मुजरा अशा महाराजाला,
जो मुघलांना हलवुन गेला.....
पाणी पिताना शिवाजी दिसला,
तर फिरे मोगलांचा घोडाही मागे,
मर्द मराठा असा होऊन गेला,
करून संपूर्ण महाराष्ट्रात जागे.....
करुन तांडव तख्त दिल्लीचा जिंकला
कधीं न केली चिंता परिणामांची,
साथ सदैव ज्यांच्यापाठी,
माय भवानी अन आई जिजाऊंची....
परस्त्री ही मातेसमान,
दिली शिकवण या जगाला
दुश्मनाच्या बायकांनाही
सन्मान दिला जगायला....
असा शूर योद्धा जन्मला,
या महाराष्ट्राच्या मातीत,
स्वराज्याचा झेंडा रोवला,
प्रत्येकांच्या छातीत......
चला शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभुची घेऊन स्फूर्ती,
एक ध्यास धरू मनी,
जपू महाराष्ट्राची संस्कृती......
