STORYMIRROR

Mahananda Bagewadi

Romance Others

3  

Mahananda Bagewadi

Romance Others

बेत प्रेमाचा

बेत प्रेमाचा

1 min
152

चोरुन तुच आता हृदयात येत आहे..

आठवणी तुझ्या मजवर ताबा घेत आहे..


प्रेम असेल माझे तुझ्यावरच तेव्हा..

मन हे माझे मजला सांगुन देत आहे..


वेडी नशा मलाही रोजच चढते आहे..

प्रेमात रमण्याचा वेगळाच बेत आहे..


मुक्काम होत गेला राती तुझ्या घरी तो..

स्वप्नात का सखे मग चोरुन येत आहे..


शिंपडून टाक सडा सुगंधी फुलांचा तू,

हे मोकळे हृदयात अंगण तुझेच आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance