" 'ती' सध्या घाबरते "
" 'ती' सध्या घाबरते "
अन्यायाविरुद्ध दाद मागायला
'ती' सध्या घाबरते !
नोकरीच्या ठिकाणी जाण्यास
'ती' सध्या घाबरते!
एकटीने प्रवास करण्यास
'ती' सध्या घाबरते!
सातच्या नंतर बाहेर पडण्यास
'ती' सध्या घाबरते!
शहरात एकटीने राहण्यास
'ती' सध्या घाबरते!
मनाजोगता पेहराव करण्यास
'ती' सध्या घाबरते!
कॉलेज ची वाट चालण्यास
'ती' सध्या घाबरते!
क्लासेस , ट्यूशन च्या रस्त्यावरून जाण्यास
'ती' सध्या घाबरते!
मुक्तपणे जीवन जगण्यास
'ती' सध्या घाबरते!
गर्दीच्या ठिकाणी जाण्यास
'ती' सध्या घाबरते!
नात्यावर विश्वास ठेवण्यास
'ती' सध्या घाबरते!
स्वतःच्या भावना व्यक्त करण्यास
' ती' सध्या घाबरते!
पुरुष जातिशी मैत्री करण्यास
'ती' सध्या घाबरते!
सिनेमे , सहली , हॉटेल मद्धे जाण्यास
'ती' सध्या घाबरते!
उत्सवा मद्धे सहभाग घेण्यास
' ती' सध्या घाबरते!
शिक्षणासाठी बाहेर राहण्यास
'ती' सध्या घाबरते!
ती सध्या घाबरते, ती सध्या घाबरते
वरुन जीवंत दिसत असली तरी
रोज थोड़ी थोड़ी आत मरत ती जाते !
रोज थोड़ी थोड़ी आत मरत ती जाते !!
