ती पाहताच बाला
ती पाहताच बाला
ती पाहताच बाला , कलिजा खलास झाला
सावरी ओढणीला , तिरपा कटाक्ष मजला
सावळी गोड तनूअन् , गोबरे गाल मऊ ते
गालावरीच तीळ , जळवी मम मानसाते
रेशमी कुरळे कुंतल , सावरी वरवरी ती
मध्येच बट चुकार , मम मानसी विराजी
अबोली असावी , का असावी ती रेश्मा!!
प्रेमाच्या नगरी , माझीच ती करिश्मा
ओळख नसे परि , नयनांस भिडती नयन
काहीच आगळे रंग , अलगद मनी तरंग
त्या तरंगातच तरुनी, तिजपाशी मीच गेलो
"एक्सक्युज मी" म्हणूनी , चक्क मिशीमधुनी गोड हसलो
प्रेमपथ माझा तो , विवाहवेदीवरीच गेला
बाला आता नसे ती पत्नीच आज मजला
' तिरपा कटाक्ष ' आता रोजचाच झाला
ती पाहताच बाला , कलिजा 'का ' खलास झाला?