ती आई असते...
ती आई असते...
कधी काजळाचा टिका लावणारी
तर,कधी मीठ, मोहरीची दृष्ट काढणारी
ती असते आई...
कधी तळहाताचा झोपाळ करून निजवणारी
तर,कधी गोड मधुर,अंगाई गाणारी
ती असते आई...
कधी मायेने ,माथ्यावर चुंबन करणारी
तर ,कधी चुकल्यावर डोळे वटारणारी
ती असते आई...
लेकराच्या मनाचा,अचूक ठाव घेणारी
वेळोवेळी,ओलावलेले डोळे अलगद पदराने पुसणारी
ती असते आई..
नेहमीच,देवाकडे फक्त लेकराच सुख मागणारी
तर,कधी स्वतः उपाशी राहून लेकरास घास भरवणारी
ती असते आई...
पदरात बांधलेली ती,चुरगळलेली नोट हळूच काढून देणारी..
तर नेहमीच,तीच सार आयुष्य लेकराच्या भविष्यासाठी खर्च करणारी .
ती असते आई...
