तिची अदा
तिची अदा
शाळेच्या गेटवर नेहमी असायचा
घोळका तिला पहायला
प्रत्येकजण तयार असायचा
तिच्या स्वप्नात रहायला
लांबसडक केस उडवत
ती यायची मैत्रिणीसोबत
तिला पहाणाऱ्यांकडे बघताना
मिरच्या माझ्या नाकाला झोंबत
दिसायला होती सुबक जरी
हसण्यावर तिच्या फिदा सारी
होती सदा तिची अदाच निराळी
डोळ्यासमोर तिची सावली तरळी