तिचे प्रेम
तिचे प्रेम
जेव्हा ती प्रेमात पडली.
त्याला तिने गुणदोषासहित स्वीकारले.
वाईट सवयीपासून दूर ठेवले.
त्याच्या भावनांची कदर केली.
दुःखात त्याला साथ दिली.
चुकल्यास माफी ही मागितली.
विचारांची देवाणघेवाण करून नवे मार्ग अवलंबले.
तो रुसला तर त्याला हसवले.
साथ त्याची जणू तिला हवीहवीशी वाटू लागली.
सुखादुःखात त्याचीच आठवन तिला येई.
कधी कधी त्याच्या आठवणीने तिचे मन उदास होई.
त्याचा सहवास संपूच नये असंही तिला वाटू लागले.
तो जोडीदार बनून आयुष्यभर आपल्याशी प्रामाणिक राहावा.
हीच तर अपेक्षा तिची होती.
त्याच्यापासून सुरु झालेलं प्रवास
शेवटी त्याच्याच मांडीवर संपावा.
आता दोघांची लग्नघटिका जवळ येऊन ठेपली.
सप्तपदी चालताना...,
तिने हात त्याचा हाती घेतला.
जन्मोजन्मीच नातं निभवण्यासाठी
नाजूक प्रेमाचा धागा तिने विणला....
एका नाजूक प्रेमाच्या धाग्यात विनले गेले...
दोन प्रेमी....
हीच भावना तर होती तिची प्रेमाची ....!!
#lovelanguage
#माझेलेखन ✍️

