STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

तिचे आकाश

तिचे आकाश

1 min
235

तिचे आकाश अनंत

तिची झेपही तुफान

तिची भरारी अंबरी

स्थळ काळाचे न भान


शक्ती अनंत हस्ताने

विधात्याने अर्पियली

विधायक कार्यांमधे

खुबीनेच वापरली


माया प्रेम वात्सल्याने

बाळे आपलिशी केली

सिंधुताई माऊलीने

दयाबुद्धी दाखविली


तिन्ही सैन्यदलांमधे

पराक्रम महिलांचा

बळ रणरागिणीचे

करी संहार शत्रूचा


तिचे आकाश नित्यचि

कर्तृत्वाने विस्तारित

यश किर्ती लाभो तिला 

असे मनीषा प्रार्थित


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract