STORYMIRROR

Prachi Kulkarni

Romance

4.9  

Prachi Kulkarni

Romance

तिचा हुंकार

तिचा हुंकार

1 min
1.0K


जीवघेण्या वेदनेतूनच जन्मतो , अवघा हा संसार

तिच्या मातृत्वाने का करावा , निवडीच्या अभिशापाचा स्वीकार

आई, ताई, सई सवे आयुष्य बहरत जाते

तिच्याच अस्तित्वावर , प्रश्नचिन्ह का उमटते

सप्तरंगी नात्यांमधील , ती समाधानाचा हुंकार

विज्ञानाच्या युगातही , ती समाजाचा संस्कार

गर्भातून अंकुरणारा , ती ही एक चैतन्यस्पर्श आहे

हरएक क्षणांसवे बहरणारा , जगण्याचा नवहर्ष आहे

तेजोसामर्थ्याने तिच्या , भूत भविष्य नि वर्तमान फुलावा

मग नकाराचा आकार तिच्याच श्वासाबरोबर का जोडावा

झळाळणाऱ्या हिऱ्याची , जन्माआधीच का दुर्गती

तिची पूजा आणि पतनहि , पहा समाजातील विसंगती

आदिउगमावर घालू नका आधीच घाला

राष्ट्र उभारण्या थांबवू ही स्त्री भ्रूणहत्या.....

अन् माणुसकीचा धर्म पाळा....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance