STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Romance

5.0  

गोविंद ठोंबरे

Romance

थोडे तुझे नि माझे थोडे..

थोडे तुझे नि माझे थोडे..

1 min
15.6K


गंध ऐसा दे सखे ।

बेधुंद मज होऊ दे।।

तुज स्पर्श स्पर्श गारवा।

मज अंग अंग झोंबू दे।।


मदिरा नजर मैखान्याची।

मदमस्त मज पिऊ दे।।

मैफिलीत सांज रातीच्या।

मज हर्ष हर्ष होऊ दे।।


बेजुबान ओठ ओले।

कर्ज ना तुझे फिटू दे।।

नशील्या टपोर डोळ्याचे।

मज सावज शिकार होऊ दे।।


थोडे तुझे नि माझे थोडे।

हट्ट खट्याळ होऊ दे।।

एकांती साखर मिठीचे।

मज रोम रोम शहारु दे।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance