STORYMIRROR

Prashant Shinde

Action Others

3  

Prashant Shinde

Action Others

थंडी...!

थंडी...!

1 min
207

थंडी आली वेशीवर

बंडी नाही अंगावर

आळा बसला दंग्यावर

बिलगली सारी कोपऱ्यावर...!

आडोसा शोधता

सूर आले जुळून

चिकटून बसली

कोपरा धरून...

शेपूट बाहेर टाकून

ऊब ऊराची घेतात चोरून

वेळ न्हेतात थंडीची

लीलया मारून...

ना भूक ,ना तहान

बिलगून बसणे खूप महान

डोळ्यात पहाता येते जान

पण 

टवकारून बसावे लागतात कान...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action