शेतकरी राजा
शेतकरी राजा
मनाने समृद्ध आणि वृत्तीने समाधानी
रात्रंदिवस मेहनत करून खाई कष्टाची भाकरी
"जगाचा पोशिंदा"
पोसतो ही दुनिया सारी
कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा
पहाट होताच लागतो
आपल्या कार्याला
अपार तुझे श्रम अन्
घामाचे मोती
अन्नधान्याचे उत्पादन
शेतकरी राजा केवळ तुझ्या हाती
तप्त सूर्य डोक्यावर
असूनही करतो
जीवाचे रान स्वप्न पेरतो त्यात अन्
मातीतून पिकवतो जणू
सोन्याची खाण
मुक्या जीवांना लेकरांसारखा जीव लावतो
शेतावर राबतो दिवस-रात्र विसरूनी सारे भान
ओला दुष्काळ सुका दुष्काळ
अखंड हाल करतो सहन
हजारो समस्यांनी ग्रस्त असला
तरी देतो नेहमी संकटांना आव्हान
कष्ट करतोस तू म्हणून शिवार होते हिरवेगार
रक्ताचे पाणी करून आणतो तू शेतीला नवचैतन्य नवी बहार
अन्नदाता तू सकलांचा
उभा कंबर कसूनी शेतावरी
वाटे आतातरी बघणार असावं तुझ्याकडे कुणीतरी...?
निसर्गाची सदैव साथ मिळो तुला
योग्य भाव मिळो तुझ्या पिकाला
शेतकरी राजा तुझ्यामुळे खर तर
अर्थ मिळतो दैनंदिन
आमच्या जीवनाला
सलाम तुझ्या कष्टाला
आणि घामाला
आसमानी संकटाशी सामना करत असताना
यश मिळो सदा तुझ्या कार्याला🙏
