STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Action Inspirational

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Action Inspirational

आयुष्यातील इंद्रधनुष्य

आयुष्यातील इंद्रधनुष्य

1 min
351

आयुष्यातील इंद्रधनुष्य 🌈

सात रंगांनी सजावे

सुखदुःखाचे सोबती

मायबाप नित्य पुजावे...!!


शांततेचा रंग पांढरा

संयमाने सदा रहावे

त्याग,समर्पण चित्ती

कधी जीवनात पहावे...!!


आकाशाचा निळा रंग

विशाल ह्रदयासम असावे

सागराचे अवखळ पाणी

झ-यासम खळखळावे....!!


हिरवा शालू नेसून बसली

सुंदर दिसते वसुंधरा

ओंजळभर दाणे टाकत

शेतकरी पोशिंदा खरा....!!


विठुराया चरणी साकडे

घालून करते नित्य प्रार्थना

सर्वांना सुखी ठेव देवा

तव शांती मज मिळेल मना...!!


 पिवळा रंग उठून दिसतो

चाफ्यात मिश्रित भावतो

नानाविध रंग निसर्गाचे

चल इंद्रधनुत दावतो....!!


ॠतूप्रमाणे रंग सजती

आयुष्यातील इंद्रधनुष्य शोध

माणसाच्या कामी पडावे

आयुष्याचा घे खरा बोध....!!


Rate this content
Log in