मेघ
मेघ
💨☁️
आज दुपारी अचानक सूर्य एकाकी नाहीसा झाला मध्यान्हीच्या वेळीदेखील संध्येचा जणू भास झाला
भरभर भरला मेघ मंडपी नभा काळी दाटली अंबरी ☁️💨
पाहता-पाहता मोत्यांची माळ तुटावी
तशी सर धरतीवर आली,🌧
रंगीबेरंगी फुलपाखरे ही
इकडून तिकडून उडू लागली🦋
फुले पाने सारी मग चिंब.. त्यात न्हाऊनी गेली...🌱🌿🌸
दाटलेले मेघ नभीचे मुक्त होऊन बरसता,
मेघगर्जना होता, कुणी धावतांना धडपडल
कोणी कोणाला सावरलं, कोणी सखीचा हात धरत मनातल्या मनात बावरलं, बरसणाऱ्या धारेमध्ये कोणी शोधले हरवले क्षण, कोणी पावसात आसवे लपूनी हलके केले असेल आपले मन...
स्वच्छंदी मेघ हे
घेतात वारयासोबत पावसाचा वेध
वाटते तेव्हा...
झरे मेघ आभाळी तेव्हा भान हरपुनी चिंब भिजावे
थेंबाचे इवलेसे मोती तळहातावर झेलून बघावे
ओल्या मातीच्या गंधात न्हावे
धरून बोट वाऱ्याचे डोंगर दऱ्यांमध्ये फिरून यावे
पाऊस वेळा पक्षी होऊन क्षितिजावरच्या
इंद्रधनूच्या रंगांमध्ये रंगून जावे...
चैतन्य हे सारे नयनांमध्ये भरून घ्यावे...🙏😊☺️
