आई
आई
आई म्हणजे आई असते
मंदिरातला देव असते
हृदयातली भक्ती हसते आंतरिक शक्ती असते
दृश्य नसली तरी सर्वत्र असते
आई म्हणजे आईच असते ।।
सृष्टीचे सौंदर्य असते
पहाटेचा सूर्य तर रात्री चंद्र असते
आकाशातला ताऱ्यांचा शांत प्रकाश असते
आई म्हणजे आईच असते।।
तिच्याशिवाय सार रीतच असते
गजबजलेल्या घराची ती नीव असते
नदीच शांत पाणी असते
आई म्हणजे आईच असते।।
लेकराचा आधार असते मोठ्यांचं हृदय असते
ती घरात नसली तर घर अशांत असते
आई म्हणजे प्रेमाचा सागर
आई म्हणजे आईच असते।।.
