STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy Action

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy Action

आज एकल्या वाटतात...

आज एकल्या वाटतात...

1 min
206

आज एकल्या वाटतात सावल्या या उन्हात्ल्या 

का उगाचच छळतात बाहुल्या त्या मनातल्या 


आज कानी घुमतात कथा तुझ्या माझ्यातल्या 

का उगाचच गुंततात भावना या मनातल्या 


आज सांज एकली ही आठवताच सोबतीला 

का उगाचच सलतात आठवणी या मनातल्या 


आज ही साथ देतात रात्री आसवे ही पापणिला 

का उगाचच जागतात आस्था त्या मनातल्या 


आज रात्र ही संपेना वीरहाच्या या क्षणाला 

का उगाचच सांगतात व्यथा तुझ्या मनातल्या 


आज ही एकल्या त्या वाटेला भेटता मी रात्रिला 

का उगाचच आठवतात त्या प्रतिमा मनातल्या 


आज रात्र एकांतात वाटे असावे तू सोबतीला 

का उगाचच भासतात सावल्या मोठ्या मनातल्या 


आज सपेना संपता काळोखी दाटली रात्रिला 

का उगा ना राहतात दुरव्यात शंका या मनातल्या 


आज मन हे जाणते येणार ना परतुनी तू उद्याला

का उगाचच देतात मोठाल्या आशा त्या मनातल्या 


आज एकली जरी निवांतात दुराव्यात या क्षणाला 

का उगाचच देतात श्वास आसक्तीस या मनातल्या 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance