थांब ना!
थांब ना!
तुझियात हारलेला माझा निहार आहे.
तुझियाच लोचनांच्या खोड्याच फार आहे.
उबदार रेशमाच्या स्पर्शास मी भुलावे?
रात्रीत बांधलेला अंधार गार आहे.
स्पर्शून जिंकलेला गुंता कसा बघावा.
श्वासात थांबलेल्या डोळ्यात हार आहे.
मदमस्त चोरवाटा दवबिंद धूर्त आले.
पाशात चोरटा तो, तोही फरार आहे.
चंदा नभात आहे, नाही पहाट झाली.
आताच जायचा का तूझा विचार आहे?

